घरठाणेठाण्यात लहरी हवामान, ऊन-पावसाच्या खेळामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठाण्यात लहरी हवामान, ऊन-पावसाच्या खेळामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Subscribe

ठाणे – गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाने दडी मारली होती. आज सकाळपासूनच ठाणेकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. मात्र, सायंकाळी पाचच्या दरम्यान तुफान पाऊस झाल्याने ठाणेकरांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. दरम्यान, मागील आठ दिवसात ठाण्यातील तापमान अचानक ३३ ते ३७ अंशाच्या घरात पोहोचल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. तर, ठाण्यातील हे लहरी हवामान आजाराला आमंत्रण देणारे ठरणार आहे.

मार्च महिन्यात ठाणे महापालिका क्षेत्रात तापमानाचा पारा ४६ अंशावर गेला होता. तीन ते चार दिवस तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत कायम होता. एप्रिल आणि मे महिन्यात असेच काहीसे चित्र होते. जून महिन्यात पाऊस सुरू होताच शहरातील तापमानाचा पारा कमी झाल्यामुळे उकाडा कमी झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने मोठी उसंती घेतल्याने उष्णता वाढली. तर, आठ दिवसांपूर्वी ठाणे शहराचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून त्यात वाढ झाल्याने ते तापमान ३० अंश सेल्सिअसवरून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.

“वातावरणातील बदल नेमका कशामुळे झाला आहे आणि तापमान आणखी किती दिवस असे राहील, याबाबत काहीही सांगता येणार नाही.”-

मनिषा प्रधान , प्रदुषण नियंत्रण अधिकारी, ठामपा

- Advertisement -

ठाणे शहरातील तापमान आकडेवारी
तारीख                 तापमान
२६ ऑगस्ट             ३३
२७ ऑगस्ट             ३४
२८ ऑगस्ट             ३४
२९ ऑगस्ट             ३३
३० ऑगस्ट             ३६
३१ ऑगस्ट             ३५
१ सप्टेंबर               ३७
२ सप्टेंबर               ३५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -