उल्हासनगर मध्ये विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार नागरिकांवर कारवाईतून २२ लाखांची दंड वसूली

६ हजार २२२ विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानदार व मॅरेज हॉलवर केली दंडात्मक कारवाई

In Ulhasnagar, a fine of Rs 22 lakh was levied on 6,000 citizens traveling without masks
दंडात्मक कारवाई

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिवर इंजेक्शनचा ही तुटवडा जाणवत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तरीदेखील नागरिक कोरणा बद्दल गंभीर होताना दिसत नाहीत. उल्हासनगरमध्ये संचारबंदी च्या काळात विना मास्क फिरणाऱ्या तब्बल सहा हजार पेक्षा अधिक नागरिक, दुकानदार आणि मॅरेज हॉल यांच्याकडून महापालिकेच्या भरारी पथकाने तब्बल २२ लाख २० हजाराचा दंड वसूल केला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. असे महापालिकेच्या वतीन सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर मध्ये लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची जनजागृती महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. तरीदेखील शहरातील नागरिक नियमाची पायमल्ली करत विनाकारण बाहेर फिरत होते. त्यामुळे पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्याच्या २३ ते २८ दरम्यान तब्बल ८९८ विना मास्क फिरणाऱ्या नांगरिकांवर कारवाई केली.यासोबतच ३३ मॅरेज हॉलवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानंतर मार्च महिन्यात चार हजार १९५ नागरिकांवर कारवाई करून नऊ लाख ४६ हजार ची दंडात्मक कारवाई केली तर एप्रिल महिन्याच्या २१ तारखेपर्यंत १ हजार १२७ जनावर कारवाई केली.

उल्हासनगर महानगरपालिकेने भरारी पथके स्थापन केली. संचारबंदी च्या कालावधीमध्ये या भरारी पथकाने तब्बल ६ हजार २२२ विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानदार व मॅरेज हॉल यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तब्बल बावीस लाख २२ हजार चा दंड वसूल केला. ही कारवाई सुरू असताना ही नागरिक व गाडी चालक बिनधास्त रस्त्यावरून वेगवेगळी कारणे सांगून फिरत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करणार असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले.