घरठाणेउल्हासनगरात महाआघाडीत फूट रिपाइंची भाजपशी जवळीक

उल्हासनगरात महाआघाडीत फूट रिपाइंची भाजपशी जवळीक

Subscribe

रिपाइंने सोडली शिवसेनेची साथ

उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना- रिपाई- काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे मात्र स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाईने महाआघाडीची साथ सोडून भाजपशी सलगी केली आहे.रिपाईचे ( आठवले ) पक्षाचे शहर अध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी पक्षाची भाजपशी नैसर्गिक युती असताना देखील ८ वर्षांपासून शिवसेनेशी सलगी केली आहे. यामुळे रिपाइंचे अनेक स्थानिक नेते नाराज झाले होती आणि पक्षाच्या कार्यक्रमातून स्वतःला दूर ठेवले होते . दरम्यानच्या काळात महाआघाडीमध्ये महात्वांच्या पदांची वाटाघाटी झाली याचा फायदा सर्वच पक्षांना झाला , रिपाईच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद भगवान भालेराव यांना मिळाले.

 

- Advertisement -

स्थायी समिती सभापती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज अचानक उपमहापौर भगवान भालेराव यांनी महाआघाडीतुन बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला असून यापुढे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः भालेराव हे स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक उमेदवार असून स्थायी समितीत भाजपची बाजू वरचढ असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी भाजपचे ८ सदस्य असून १ सदस्य साई पक्षाचा आहे जो भाजप सोबत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे ५ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १, रिपाइं १ अशी सदस्य संख्या आहे . रिपाई भाजप सोबत गेल्यास ही निवडणूक जिंकणे भाजपसाठी सोपे जाईल तर शिवसेनेकडून भाजप युतीच्या साई पक्षाच्या सदस्याला फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे . शिवसेने तर्फे कुलवंतसिंग सोहंता, आकाश पाटील हे इच्छूक उमेदवार आहेत.

 

- Advertisement -

येत्या १५ एप्रिलला स्थायी समिती सभापती निवडणूक होणार होती तूर्त ही निवडणूक स्थगिती करण्यात आली आहे .स्थायी समिती सभापतीची निवडणूकीत चुरस निर्माण झालेली असताना अचानक उपमहापौर भगवान भालेराव यांनी महाआघाडी शिवसेनेची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे.आमच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली या चर्चेनंतर मला आठवले साहेबांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत युती करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे आमचा पक्ष कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत राहणार आहे. भाजप- रिपाइं युती स्थायी समिती सभापती निवडणूकीसाठी जो उमेदवार ठरवतील त्याला माझा पाठिंबा असेल. असे उपमहापौर, रिपाइं चे शहर अध्यक्ष भगवान भालेराव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -