घरठाणेकळवा- खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाला अखेर मुहूर्त सापडला

कळवा- खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाला अखेर मुहूर्त सापडला

Subscribe

 पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा खारेगाव फाटक येथील उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्याला अखेर मुहूर्त सापडला असून हा सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उड्डाणपुलावरून काही दिवसांपूर्वी ठाण्यात चांगलेच राजकारण तापले होते. यावेळी गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासन आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या भागात खारेगाव उड्डाणपूलाच्या बांधकाम सुरू झाले. एप्रिल महिन्यात हा पुल खुला होईल असे आश्वासन स्वत: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. परंतु यात अडचणी आल्यानंतर २० डिसेंबरला हा पूल खुला होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरची तारीख पुढे आली होती. याचदरम्यान राजकीय वातावरण ही तापू लागले होते. त्यातच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच त्याचे लोकार्पण होईल असा दावा केला होता.

- Advertisement -

त्याचवेळी, या पुलाचे लोकार्पण राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करावे, अशी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यावर या पुलाचा लोकार्पण सोहळा हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी १५ जानेवारीला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -