घरठाणेउल्हासनगरात तीन ठेकेदारावर आयकर विभागाचे छापे

उल्हासनगरात तीन ठेकेदारावर आयकर विभागाचे छापे

Subscribe

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत टेंडर घोटाळ्यात ज्या ठेकेदारांचे नाव घेण्यात आले होते त्या ठेकेदारांच्या घरात आणि कार्यालयात आयकर विभागाचे छापे पडल्याने उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या महापालिकेच्या कामातील ठेकेदारी करणा-या करणाऱ्या तीन ठेकेदारावर आयकर विभागाने छापे टाकले असून मात्र या ठेकेदारांवर काय कारवाई केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जय भारत कंट्रक्सन, जय हिंद कंट्रक्सन व झापी या तीन कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या विभागाचे अधिकारी उल्हासनगरात तळ ठोकुन आहेत.

४२ कोटी रुपये कॉंक्रिट रोड करिता देण्यात आले होते. यावरून भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले होते. त्या नंतर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने दोन्ही गटातील वाद मिटवण्यात आला. या तीनही ठेकेदारांच्या कार्यलयावर आयकर विभागाचे छापे पडल्याने शहरात चर्चे चा विषय बनला आहे. महापालिकेचे काही अधिकारी सुध्दा आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -