घरठाणेलसीकरण केंद्रांची माहिती एका क्लिकवर

लसीकरण केंद्रांची माहिती एका क्लिकवर

Subscribe

ठाण्यात शुक्रवारी दोन खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्रांची संख्या वाढत असून ती संख्या आता ३० वर झाली आहे. त्यातच ठाण्यात शुक्रवारी दोन खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाले आहे. याचदरम्यान राहत असलेल्या परिसरातील केंद्रांची माहिती नसल्याने ठराविक एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने नागरिकांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे. यासाठी डिजी ठाणे आणि ट्विटरची मदत घेत त्यावर महापालिकेने तयार केलेली लिंक उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ६० टक्के नोंदणी ही ऑफलाईन तर ४० टक्के नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला १ मार्च पासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आल्यावर पहिल्या दिवशी १५ केंद्रावर लसीकरण सुरु होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसात ती संख्या दुपटीने वाढून ५ मार्चला संख्या आता ३० झाली आहे. चार दिवसांनी आता ज्युपीटर आणि न्यु हॉराईझन प्राईम या दोन खाजगी रुग्णालयात शुक्रवार पासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. उर्वरीत ७ खासगी रुग्णालये देखील लवकरच सुरु केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार आतापर्यंत ३६ हजार हेल्थ वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करला लस देण्यात आली आहे. तर १ मार्च पासून ४ मार्चपर्यंत ४५ ते ६० वयोगटातील ६१५ तर ६० वयोगटापुढील ३६०० जेष्ठांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर गुरुवारी एका दिवशी २९९४ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याशिवाय शहरात येत्या काही दिवसात आणखी लसीकरण केंद्र सुरु असल्याची माहिती महापालिकेने सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

ठामपाच्या सध्या २५ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. त्यातील १५ केंद्रावर रोजच्या रोज लसीकरण केले जात आहे. परंतु उर्वरीत १० केंद्रावर एक दिवस आड लसीकरण केले जात आहे. ही १० आरोग्य केंद्र छोटी असल्याने त्याठिकाणी इतर दिवशी गरोदर मातांची तपासणी, कधी लहान मुलांचे लसीकरण असल्याने गर्दी वाढण्याचा धोका असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये ढोकाळी, बाळकुम, शिळ, वर्तक नगर, उथळसर, आतकोनेश्वर नगर, नौपाडा, काजुवाडी, कोपरी आणि सावरकर नगर केंद्राचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र, त्याची माहिती नागरिकांना नाही. या शिवाय नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता पालिकेने डीजी ठाणे आणि ट्विटर यांच्या माध्यमातून एका क्लिकवर प्रत्येक नागरिकाला तो वास्तव्यास असलेल्या केंद्राची माहिती मिळणार असून ते केंद्र नेमके कुठे आहे, याची माहिती घर बसल्या मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -