घरठाणेअनुसूचित जातसमुदायांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारणार

अनुसूचित जातसमुदायांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारणार

Subscribe

 खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण व नागरी वस्तीचा विकास करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाणे , कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर  या महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद तसेच तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल ११.३५ कोटी रूपयांचा निधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंजूर केला आहे. अशी माहिती खासदार डॉ.  शिंदे यांनी दिली आहे.

राज्यातील नागरी व ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या, गावांचा विकास करण्यासाठी शासन विविध माध्यमातून निधीची उपलब्धता करत असते.  तसेच या भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरून मान्यता देण्यसाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” सन २०१८-१९ पासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ही योजना राज्यस्तरीय असून या योजनेमध्ये असलेल्या कामाच्या यादीत भर घालण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीशी निगडीत स्थळे तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील वस्ती सुधार योजनेमध्ये उपलब्ध असलेला निधी कमी पडत असेल, तर पुरेसा निधी उभारण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो.

- Advertisement -

दलित वस्तीत पाणीपुरवठा, मलनि:सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणे, स्मशान भूमीचा विकास करणे, पथदिवे, पर्जन्य पाण्याचा निचरा, सार्वजनिक सुलभ शौचालय, व्यायाम शाळा, ग्रंथालय व अभ्यासिका भवन, धम्मा केंद्र, दिपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र या कामांचा समावेश या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत होतो. कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या दलित वस्ती मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी या योजनेत निधी मिळावा याबाबत खासदार डॉ. शिंदे यांनी मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील कामासाठी ११.३५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये असलेल्या दलित वस्ती मधील पायाभूत सुविधा उभारता येणे शक्य होणार आहे. यामध्ये ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषदेचा तसेच कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाचाही समावेश करण्यात आला आहे.

निधीच्या वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या (दलितवस्ती) विविध विकासकामांसाठी ११.३५ कोटी मंजूर केलेल्या निधी पैकी १.०० कोटी रुपयांचा ठामपा क्षेत्रासाठी, अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रासाठी १.२५ कोटी रुपये, अंबरनाथ तालुक्यासाठी ३.०० कोटी रुपये,  आणि उल्हासनगर क्षेत्रासाठी २.३० कोटी रुपये तर  कल्याण – डोंबिवली क्षेत्रासाठी ३.८० कोटी रुपये मंजूर केला आहे. या निधीमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकवस्तीत चांगल्या प्रकारचा विकास करता येईल अशी अशा खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या (दलितवस्ती) विविध विकासकामांसाठी ११.३५ कोटी निधी मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -