घरठाणेमहापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी

महापालिका आयुक्तांकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी

Subscribe

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कापूरबावडी नाला, आनंदनगर नाल्याची पाहणी केली. नाले सफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या तसेच सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या .

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आग्रही असलेले महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी शहरातील नालेसफाई, रंगरंगोटी, फुटपाथ दुरुस्ती आणि खड्डे दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही तसेच कुठलीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन येथील खड्डे दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून कापूरबावडी नाका नाल्यापासून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, डॉ. बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कापूरबावडी नाला, आनंदनगर नाल्याची पाहणी केली. नाले सफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या तसेच सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या .तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून कॅडबरी जंक्शन सेवा आणि लुईसवाडी येथील सेवा रस्त्यांचे पूर्णतः डांबरीकरण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. शहराच्या सौदर्यात विशेष भर पडावी यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंती तसेच रस्ते दुभाजक आकर्षक रंग तसेच भिंतीचित्रांनी रंगवण्याचे काम सुरु असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी विवियांना मॉल, बारा बंगला, मुलुंड चेक नाका, आनंदनगर येथील रंगरंगोटी कामाची पाहणी केली. दरम्यान रंगरंगोटीचे काम करण्याअगोदर संपूर्ण परिसर स्वच्छ करून ही सर्व कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागास दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -