घरठाणेकेडीएमसी आयुक्तांकडून कामाची पाहणी

केडीएमसी आयुक्तांकडून कामाची पाहणी

Subscribe

स्वच्छता आणि विकासकामांबाबत सूचना

कल्याण । मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे. केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी कल्याण शिळ रस्ता, काटई नाका ते दुर्गाडी पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली. कल्याण काटई नाका येथील ट्रॅफिक नियंत्रण अनुषंगाने चौकाचे फॅनिंग (चौक विस्तारीकरण) तसेच चौकाचे नियोजन करुन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविणेबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. काटई नाका ते पत्रीपुल या मार्गावर दुतर्फा करण्यात आलेली खुदाई व पदपथावरील यावरील डेब्रिज उचलणे बाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पत्रीपुल ते दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बायपास रस्त्यामधील पुलाचे गर्डर तसेच लेबर शेड हटविणेबाबत एमएसआरडीसी विभागास निर्देश दिले. गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील कचरा तसेच डेब्रिज उचलणेबाबत आणि संबंधीत तबेलेधारकासही सूचना देण्यात आल्या. गोविंदवाडी-दुर्गाडी चौकात वाहतुकीचे नियोजनातून भटाळे तलाव येथील विकास योजनेतील रस्त्यातील अतिक्रमणे हटविणेबाबत संयुक्त मोहीम हाती घेण्याबाबत सूचना महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -