घरठाणेउल्हास नदीला व्यापून टाकलेल्या जलपर्णीला साफ करण्याचे निर्देश

उल्हास नदीला व्यापून टाकलेल्या जलपर्णीला साफ करण्याचे निर्देश

Subscribe

उल्हास नदीला जलपर्णीने व्यापून टाकल्याने पाण्यावर आच्छादन तयार केले आहे. नदीपात्राच्या बाजूलाच मोहने बंधारा व मोहिनी गावाजवळ वाहणाऱ्या या नदीतून 320 दश लक्ष लिटर प्रति दिन पाणी कल्याण डोंबिवली महापालिका उचलत आहे. पाणीपुरवठ्यावर या जलपर्णीने विपरीत परिणाम घडू नयेत तसेच नदीपात्रातील जलचर प्राण्यांवर ऑक्सिजनची मात्रा कमी पडल्याने जलचर पाणी मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक असल्याने या नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम मनुष्यबाळामार्फत युद्ध पातळीवर गेल्या चार दिवसापासून सुरू करण्यात आले आहे. उल्हास नदीचा उगम लोणावळा येथून होत असून नदी वाहत कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या तालुक्यातून वाहत येऊन मोहने बंधारा येथे कल्याण खाडीमध्ये मिसळते. गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाहत असणाऱ्या या नदी पात्राला जलपर्णीने घेरल्याने पात्रावर हिरव्या रंगाची चादर निर्माण झाली आहे. या जलपर्णीच्या वाढत्या उगमाने नदीला पूर्णपणे झाकून टाकले आहे. नदीपात्राच्या बाजूला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे प्लांट अजून या पात्रातून पाणी उपसत जलशुद्धीकरण केंद्राने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज पिण्याची पाण्याची तहान भागवत असते. उपसा केंद्राच्या जवळच या जलपर्णीने विळखा घातल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणामाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने दाखवण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी नुकतेच प्रत्यक्षात मोहने येथील वाहत जाणाऱ्या उल्हास नदीला भेट दिली असता जलपर्णींचा वाढत चाललेला पसारा व त्याचे होणारे दुष्परिणाम लागलीच त्यांच्या लक्षात आल्याने डॉक्टर दांगडे यांनी नदीपात्रातून जलपर्णी काढून टाकण्याचे निर्देशित केले होते. गेल्या चार दिवसापासून मोहने बंधारा येथे उल्हास नदी खाडीपात्रात मिळत असल्याने जलपर्णी या ठिकाणाहून काढणे सोयीचे होत असल्याने पालिकेने मनुष्यबळाच्या सहाय्याने जलपर्णी पात्रातून काढून टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. एकीकडे जलपर्णीमुळे जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा विपरीत परिणाम होऊ नये याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी उल्हास नदी पात्रातील जलपर्णी मनुष्यबळ व बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे निर्देश देऊ केले आहेत. उल्हास नदी पात्रातून या जलपर्णीने व्यापून टाकलेले आच्छादन समूळ नष्ट करण्यासाठी पुढील दोन ते तीन महिने जलपर्णी काढण्याचे काम सुरू ठेवले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -