घरठाणेडोंबिवलीतील आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन

डोंबिवलीतील आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन

Subscribe

४५ शाळा, २५ हजार विद्यार्थी झाले सहभागी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील उद्याच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशनच्यावतीने २९ व ३० जानेवारी रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला कल्याण डोंबिवलीतील ४५ शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी भेट दिल्याची माहिती आयोजक संतोष डावखर यांनी दिली.

या वर्षीच्या प्रदर्शनात ४५ शाळा सहभागी झाल्या होत्या तर ९० प्रोजेक्ट मांडण्यात आले होते.५वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली. यावेळी दीड लाखाची रोख बक्षीस,पदके ,प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह विजेत्यांना देण्यात आली. विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा, शहरातील काँक्रिटीकरणाचे प्रदूषण, भारतातील वाहतूक व दळणवळण, शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले होते आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन, फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनात ५ वी ते ७ वी गटात साई इंग्लिश स्कूल आणि महिला समिती स्कूल यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला .तर पाटकर विद्यालयने द्वितीय आणि सेंट जॉन स्कूल तृतीय क्रमांक मिळविला .तसेच ८ ते १० वी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर स्कूल आणि गायकवाड स्कूल यांना देण्यात आला. तर द्वितीय क्रमांक रतनबुवा पाटील आणि ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक अचीवर हायस्कूल व उत्तेजनार्थ एनआरसी स्कूल यांना देण्यात आला.

- Advertisement -

पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे ५ वी ते ७ वी गटात अचीवर हायस्कूल, गणेश विद्यामंदिर, हेरिटेज स्कूल यांनी प्रथम, द्वितीय ,तृतीय आणि ८ वी ते १० वी गटात अनुक्रमे पाटकर विद्यालय, वाणी विद्यालय, शंकरा विद्यालय यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून ५ वी ते ७ वी गटात हेरिटेज स्कूलची आरुषी ओझा, पाटकर विद्यालयाचा चिंतामणी राजहंस व ८ वी ते १० वी गटात डॉन बॉस्को स्कूलचा अंगद सूर्यवंशी आणि एनआरसी स्कूलची अमृता कोकतरे यांना पुरस्कार मिळाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -