घरक्राइम'हनीट्रॅप'! प्रेमाचं नाटक करून तरूणीनं IT इंजिनिअरचं केलं अपहरण!

‘हनीट्रॅप’! प्रेमाचं नाटक करून तरूणीनं IT इंजिनिअरचं केलं अपहरण!

Subscribe

शहरातील एका आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या आयटी इंजिनियरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरूणीने खंडणीसाठी त्याचे अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आलेली आहे. वागळे इस्टेट पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध घेऊन ठाण्यातील एका इमारतीतून त्याची सुटका केली असून या प्रकरणी एका तरुणीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी या पूर्वी देखील या प्रकारचे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिषेक गुप्ता (२०) असे अपहरण करण्यात आलेल्या आयटी इंजिनियरचे नाव आहे. अभिषेक हा ठाण्यातील साठे नगर परिसरात राहणारा असून आशर आयटी पार्क मध्ये नोकरीला आहे. अभिषेकल नर्गिस मोहम्मद जावेद उर्फ नन्हे शेख या २० वर्षांच्या तरुणीने आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढले होते.

असं झालं अपहरण!

३१ ऑक्टोबर रोजी दुपारी नर्गिसने अभिषेक याला फोन करून वसई येथील बजरंग ढाबा येथे भेटण्यासाठी बोलावून घेतले. या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेले नर्गिसचे वडील जावेद आणि मावशी सबीना हिच्यासह सात जणांनी अभिषेक भेटायला येताच त्याला स्कॉर्पिओ या वाहनात बळजबरीने बसवले आणि त्याला स्कॉर्पिओमध्ये मारहाण करून विरार येथील एका इमारतीतील खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर अभिषेकच्या भावाला फोन करून त्याच्या सुटकेसाठी ४ लाख रुपयांची खंडणी मागितली, अन्यथा अभिषेकची हत्या करण्याची धमकी अपहरणकर्त्यांनी दिली. घाबरलेल्या भावाने ताबडतोब वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

- Advertisement -

वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दोन पथके तयार करून तांत्रिक तपासावरून अपहरण कर्त्याचा शोध घेतला असता अभिषेकला विरार येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने रविवारी मध्यरात्री विरार येथील इमारतीत छापा टाकून अभिषेक याची सुखरूप सुटका करून नर्गिस हिच्यासह सात अपहरणकर्त्यांना अटक केली असून त्याच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वपोनि. दत्ता ढोले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -