घरठाणेजय जीत सिंग होणार ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त ?

जय जीत सिंग होणार ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त ?

Subscribe

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर एकमत

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ही गेले काही दिवस रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयजित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जय जित सिंग हे भारतीय पोलिस सेवेच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. त्यावेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जय जित सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती.

- Advertisement -

ठाकरे सरकार मधील खातेवाटपात गृहखाते राष्ट्रवादी च्या ताब्यात असल्यामुळे या खात्यातील नियुक्त्या, बदल्या या राष्ट्रवादी मार्फतच करण्यात याव्यात असा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा आग्रह होता. तर दुसरीकडे शिवसेनेतील वजनदार मंत्री हे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद ज्या पक्षाकडे आहे त्यांनी केलेल्या शिफारशी विचारात घेऊन गृह खात्यातील नियुक्‍त्या तसेच बदल्या करण्यात याव्यात याबाबत आग्रही होते.अखेरीस आज याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी जय जित सिंह यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसातच जगजित सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश निघतील असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -