घरठाणेऔरंगजेब हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, पवारांनंतर आव्हाडांची जीभ घसरली

औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, पवारांनंतर आव्हाडांची जीभ घसरली

Subscribe

Jitendra Awhad | एकीकडे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राज्यात घमासान सुरू असताना आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरही चौफेर टीका होऊ लागली आहे.

ठाणे – छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावरून राज्यभरात गदारोळ सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. दरम्यान, अजित पवारांची पाठराखण करताना जितेंद्र आव्हाड यांचीही जीभ घसरली आहे. औरंगजेब क्रूर, हिंदुत्त्वद्वेष्टा असता तर त्याने विष्णूंचं मंदिरही फोडलं असतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही त्याने फोडलं असतं.” एकीकडे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राज्यात घमासान सुरू असताना आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरही चौफेर टीका होऊ लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का?; डॉ. जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

डॉ. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे शिवरायांच्या निधनानंतर राजगादीवर बसले. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसारच ते पुढे जाणार होते. याबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता; मराठा ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत.

- Advertisement -

अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, कसली माफी? असा प्रश्न उपस्थित करुन, त्यांनी माफी मागावी. सावरकर चुकले आहेत, मागा माफी! गोळवलकर चुकले म्हणून माफी मागा. स्त्री लंपट आणि दारुडे होते आमचे राजे? हिमंत आहे, या पानांवर माझ्याशी वाद घालायचा? हे पुरावे त्यांच्याच पुस्तकातले आहेत ना, असा प्रतिप्रश्न डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये; अजित पवारांवर संभाजीराजे संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -