Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे राहुल गांधी यांच्या बाजूने जितेंद्र आव्हाड मैदानात; ठाणे शहरात लागले समर्थनार्थ बॅनर

राहुल गांधी यांच्या बाजूने जितेंद्र आव्हाड मैदानात; ठाणे शहरात लागले समर्थनार्थ बॅनर

Subscribe

ठाणे : सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रातील भाजपा सरकारने राहुल गांधी यांचे संसद सदस्य पदाचे निलंबन केले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असताना काँग्रेसनेही समर्थनार्थ आंदोलन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरभर होर्डींग्ज लावून राहुल गांधींना समर्थन देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश देणारे बॅनर संपूर्ण ठाणे शहरात लावले आहेत. (Banners with the message ‘This country will not tolerate politics of revenge’ have been put up all over Thane city.)

- Advertisement -

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी सूरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत मिळाली आहे. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे सर्वच स्तरातून याचा निषेध होत आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावले आहेत. भारत जोडो यात्रेमधील काही छायाचित्रे वापरुन हे होर्डींग्ज तयार करण्यात आले असून छायाचित्रांखाली ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश लिहिला आहे. त्यामुळे या होर्डींग्जची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय, “वी स्टँड विथ राहुल गांधी” असा हॅशटॅगही दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -