Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे कळवा रुग्णालयात चिमुकल्यांना दिलासा

कळवा रुग्णालयात चिमुकल्यांना दिलासा

सुरु होणार लहान मुलांवरील दुर्धर आजारावरील केंद्र

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलांच्या दुर्धर आजारावरील उपचारांसाठी आणि त्या संदर्भात मार्गदर्शनासाठी आणखी एक केंद्र कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरु केले जाणार आहे. या ठिकाणी बाल पॅलिएटीव्ह रुग्णसेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने पालिकेला आपल्या तिजोरीतून एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच येथे रुग्णांना देखील मोफत उपचार केले जाणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव येत्या १८ फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.

बॅलेसेमिया, सेरेब्रल कॅन्सर नेफ्टी सिंहोम आदी शारीरिक व्याधी असलेल्या बालकांवर प्रगत वैद्यकीय उपचार करण्यासाठी ठाणो महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. टाटा ट्रस्टच्यावतीने ठाणो जिल्ह्यात अशा स्वरु पाची पाच केंद्र सुरु केली जाणार आहेत. त्यापैकी एक केंद्र कळवा रु ग्णालयात सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व त्यांच्या वेतनाची संपूर्ण जबाबदारी टाटा ट्रस्टची घेणार आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेले विशेष ख्रु पाचे स्थापत्य आणि विद्युत बदल सिप्ला ट्रस्ट करणार आहे. या केंद्रासाठी आवश्यक जागेची मालकी पालिकेकडेच असेल. हा उपक्र म पाच वर्षांसाठी राबविला जाणार असूज त्यानंतर त्याच्या उपयुक्ततेचा आढावा घेत पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या बालकांची संख्या मागील काही काळात वाढू लागली आहे. या बालकांची काळजी घेताना व त्यांच्यावर उपचार करताना पालकांसमोर अनेक अडचणी उभ्या असतात. सध्या कळवा रु ग्णालयात अशा रु ्णांवर उपचार केले जातात मात्र ते तुटपंजे स्वरुपात आहेत. त्यामुळे या केंद्रात पीडीत लहान मुलांसाठी आधुनिक उपचार पध्दती व त्यांच्या संगोपनातील अडचणींवर मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रु ग्णांसाठी आवश्यक असलेल्या विशेष पायाभूत रचना तज्ञांमार्फत उभी केली जाणार आहे. या केंद्राची निगा, देखभाल, दुरूस्ती. वीज आणि पाणीपुरवठा याची जबाबदारी ठाणो महापालिकेची असणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -