घरठाणेकल्याण-धामणकर नाका सिटी बस होणार सुरु

कल्याण-धामणकर नाका सिटी बस होणार सुरु

Subscribe

भिवंडीतील पूर्व व पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी केलेल्या मागणीची दाखल घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सिटी बस येत्या 29 मे 2023 पासून सुरु होत असून नागरिकांनी आमदारांना धन्यवाद दिले आहे.
भिवंडी शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात असून शहरात बाहेरून कामगार वर्ग येणारी संख्या मोठी आहे. हे बहुतांशी कामगार कल्याण स्थानकातून भिवंडी शहरात येतात. तसेच शिक्षणासाठी देखील शहराबाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. परंतु या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठी कसरत या कामगार वर्ग व विद्यार्थ्यांना करावी लागते. शहरातील लोकवस्ती आणि प्रवासाच्या दृष्टीने भिवंडी शहरातील शिवाजीचौक व धामणकर नाका हे दोन मध्यवर्ती ठिकाणी मानली जातात.

या ठिकाणी कल्याण- डोंबिवली मनपा परिवहन बस सेवा अंतर्गत फेरी सुरु केल्यास मोठा फायदा कामगार वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना होईल तसेच यातून परिवहन सेवेचे उत्पन्न देखील वाढेल, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख आणि भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे केलेली होती. त्यापैकी शिवाजीचौक ते कल्याण हि कडोंमनपा परिवहनाच्या सेवा सुरु आहे. धामणकर नाका या मागणीला कल्याण डोंबिवली मनपाच्या आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन विभागाचे परिवहन व्यवस्थापक डॉ.दीपक सावंत यांनी 29 मे 2023 पासून परिवहन बस सेवा अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन ते धामणकर नाका मार्गांवर फेरी तातडीने सुरु करीत असल्याबाबतचे पत्र भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिमचे आमदार याना पाठवून हि सेवा सुरु करण्याचे कडोंमनपा परिवहनाच्या सबंधित अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. भिवंडी शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी, कामगार वर्गानी या परिवहन सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार महेश चौघुले व आमदार रईस शेख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -