घरठाणेकल्याण मुरबाड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

कल्याण मुरबाड रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

Subscribe

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश, अर्थमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा

मुरबाड । मागील वर्षी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन कल्याण-मुरबाड रेल्वेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या रेल्वे प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार निम्मा-निम्मा उचलणार आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्याची अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात माहिती दिली आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबतचं काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावरील जागेचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कल्याण-मुरबाड मार्गाला मंजुरी दिली होती. केंद्र सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर या मार्गासाठी राज्य सरकारने खर्चाचा निम्मा वाटा उचलण्याची हमी घेतली आहे.

कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण किंमत 857 कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. त्यानंतर आता या कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात दिली. या रेल्वे मार्गावर कल्याण,शहाड,आंबिवली,कांबा रोड, आपटी, मामणोली, पोटगाव आणि मुरबाड अशी रेल्वे स्थानके असणार आहेत.यामुळे मुरबाड तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार आहे.कल्याण मुरबाड रेल्वे होणार हे मुरबाडकरांना दृष्टीक्षेपात आल्याने त्यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे विविध माध्यमांतून आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -