घरठाणेहुश्श! अखेर नवा पत्रीपूल कल्याणकरांच्या सेवेत दाखल

हुश्श! अखेर नवा पत्रीपूल कल्याणकरांच्या सेवेत दाखल

Subscribe

ऑनलाईनपद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पत्रीपुलाचे उद्धाटन

कल्याण-डोंबिवलीकरांची गेल्या अनेक काळापासूनची इच्छा अखेर आज पूर्ण झाली आहे. पत्री पुलाच्या कामामुळे गेल्या २६ महिन्यांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, आता या पुलाचं काम झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या दिवसाची वाट कल्याणवासी पाहात होते, त्या पत्री पुलाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. दरम्यान, कल्याणमधील वाहतूककोंडीपासून सुटका करणाऱ्या पत्रीपुलाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असून आज, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर २६ महिन्यानंतर पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन या पत्रीपुलाचे उद्धाटन केले आणि त्यानंतर हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पत्रीपुलाचे उद्धाटन केल्यानंतर रेल्वेचं मुख्यमंत्र्यांकडून कौतूक करण्यात आलं. हा पूल सेवेत दाखल झाल्यानंतर आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, सुरुवातीला रेल्वेकडून पुलाची लांबी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली दिरंगाई, करोना लॉकडाउनमुळे ठप्प असलेली वाहतूकसुविधा यामुळे पहिल्या लॉकडाउनचा तीन महिन्यांचा कालावधी वाया गेला. मे महिन्यापासून पुन्हा एकदा शासनाच्या परवानगीने पुलाचे काम सुरू करण्यात आले.

अखेर वाहतूककोंडीतून सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात पुलाचा ७६ मीटर लांबीचा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा एकसंध गर्डर बसविण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाने वेग घेतला होता. मात्र तेव्हाच अधिकाऱ्यांनी उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अखेर ठेकेदाराने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करत २२ जानेवारी रोजी पूल रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला त्यानंतर अखेर वाहतूककोंडीतून सुटका होण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

- Advertisement -

सोशल मीडियावर पत्रीपूल हीट

२०१८ मध्ये या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र त्यानंतर हा पूल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा कल्याण डोंबिवलीकरांना होती. अखेर दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून नवा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. या पुलावरून सोशल मीडियावरही अनेक जोक्स, मीम्स व्हायरल होऊ लागले आणि कल्याण डोंबिवलीकरांचा हा पत्रीपूल सर्वत्र हीट झाला. अखेर सर्वांच्या चेष्टेचा विषय ठरलेल्या नव्या पत्रीपूलाचे उद्धाटन अखेर करण्यात आले.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -