राष्ट्रवादीच्या महिलांनी कौसा येथील पाणीपुरवठा कार्यालयास ठोकले टाळे

Kausa water supply office locked by NCP women
राष्ट्रवादीच्या महिलांनी कौसा येथील पाणीपुरवठा कार्यालयास ठोकले टाळे

गेले चार दिवस मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात पाणीपुरवठा बंद आहे. गेले काही महिने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या नगरसेविका फरझाना शाकिर शेख आणि युवती कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी कौसा येथील पाणीपुरवठा कार्यालयास टाळे ठोकले.

दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे मनपाने गुरूवारी शटडाऊन घेतले होते. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतरही पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यातच एमआयडीसीची जलवाहिनी फुटली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण शिळ रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढला जात नाही. चार दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद असतानाही टँकरने पाणी पाठविले जात नाही. त्यामुळे संतापलेल्या फरझाना शेख आणि मर्जिया पठाण यांनी पाणीपुरवठा कार्यालयास कुलूप ठोकले.

दरम्यान, शिळ-कल्याण रोडवर जी जलवाहिनी फुटली आहे. तिथे चक्क जुना पाईप लावण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा अशीच घटना घडणार असल्याची शक्यता फरझाना शेख यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – Apple Truck accident : ठाण्यात काश्मिरी सफरचंदचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत