कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग1 आणि वर्ग 2 च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचारी वर्गास रुपये 18 हजार सानुग्रह अनुदान यावर्षी देण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या 370 आशा स्वयंसेविका आणि 2 आशा गट प्रवर्तक यांना देखील रुपये 5 हजार सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना प्रथमतः सनुग्रह अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
केडीएमसी आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तकांना 5 हजार सानुग्रह अनुदान मंजूर
written By My Mahanagar Team
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -