केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Ketki Chitale remanded in judicial custody till June 7
केतकी चितळेला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अॅट्रोसिटीच्या गुन्हा प्रकरणी केतकी चितळेला कारागृहातून ताब्यात घेतले आहे. केतकी विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये 2020 साली अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये दाखल अ‍ॅट्रोसिटीचा गुन्ह्या दाखल झाला होता. या प्रकरणात सप्टेंबर २०२१ मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात केतकीला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात केतकीसोबत आणखी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत. नवी मुंबई पोलीस केतकीला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडे पोलीस तिच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळे विरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. बुधवारी तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.