शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Ketki Chitale granted bail in objectionable Facebook post case

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तिच्या विरोधात पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायबर विभागाकडे दाखल केली आहे.

अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीने ही पोस्ट शेअर केल्याचे बोलले जात आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर विविध ठिकाणी तिच्या विरोधात केतकी विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.