आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला जामीन मंजूर

Ketki Chitale granted bail in objectionable Facebook post case

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषीय आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. यानंतर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. मात्र, आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने अटक केलेल्या एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आली होती. केतकीवर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता.

काय आहे प्रकरण –

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेने ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनेच केली होती. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीने आपल्या याचिकेतून केला होता. आता केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे.