घरठाणेकेतकी चितळेला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

Subscribe

केतकी चितळेच्या (Ketki Chitale) न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत केतकी चितळेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. केतकी चीतळेने शरद पवार (sharad pawar) यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यांनतर त्या पोस्ट संदर्भात तीच्यावर गुन्हा दाखल कण्यात आला होता. या गुन्हात पोलीसांनी तीला अट केली होती. यानंतर तीला एका जून्या प्रकरणात अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांनी अटक केली होती. तीची पोलीस कोठडी संपल्यानंतर केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केले होते. यांनतर कोर्टाने तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा –  केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisement -

या प्रकरणात दाखल करण्यात आला होता अॅट्रॉसिटीचा गुन्हा –

केतकी चितळे (Ketki Chitale) हिने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला होता. केतकीने पोस्टमध्ये आक्षेपार्ह मुद्दे लिहिले होते. ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”. अशी पोस्ट केतकीने केलेली होती. याच प्रकरणात तिच्यावर 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा-  केतकी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण… – गोपीचंद पडळकर

आव्हाडांवर कारवाईची मागणी –

तीच्यावर राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केतकीचे वकील योगेश देशपांडे करणार आहेत. या शिवाय रबाळे पोलीस (thane polie) स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात जामीन अर्ज करण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने केतकी चितळे हिने पोस्ट केली होती त्याचप्रमाणे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे, मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का? असा प्रश्नही यावेळी विचारला आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -