केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला

Ketki Chitale's bail application rejected by thane court
केतकी चितळेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तिच्या अडचणी वाढल्या आहेत. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांनी (Thane Police) केतकीवर गुन्हा दाखल केला होता. हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देत ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

इतर प्रकरणात केतकीला पोलीस ताब्या घेण्याची शक्यता –

गेल्या काही दिवसांत केतकी चितळेविरोधात (Ketaki Chitale) राज्यभर गुन्हे दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट या प्रकणातच नाही तर केतकी चितळेविरोधात (Ketaki Chitale) आणखीही काही वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या प्रकरणात ही केतकीला आता ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनंतर एका अॅट्रोसिटीच्या प्रकरणात केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी (Thane Police) घेतला होता. त्यामुळे आता पुढेही इतर पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेची जेलवारी  –

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रमक आंदोलन झालं होते. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही अशाच प्रकारे गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली होती. सदावर्ते यांनाही बरेच दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. केतकी चितळेच्या बाबतीतही तेच होताना दिसत आहे. केतकीच चितळेचा वादग्रस्त पोस्ट प्रकरणातला जेल मुक्काम वाढला आहे. त्यामुळे केतकीला आणखी किती दिवस जेलमध्ये काढावे लागणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.