घरठाणेठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

Subscribe

शिंदे - फडणवीस(shinde fadnavis) सरकारने दहीहंडी सोबतच सर्व सण आणि उत्सव निर्बंध मुक्त केले आहेत. त्यामुळेच या वर्षी दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात लाखोंची बाक्षीसे सुद्धा असणारा आहेत. ठाणे(thane) शहरातील मंडळांमध्येही मोठ्या प्रमाणात चुरस रंगणार आहे .

दहीहंडी उत्सव अवघीय काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कोव्हीडच्या सावटामुळे कोणतेच सण साजरे केले गेले नव्हते. सगळ्याच सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. पण या वर्षी मात्र सर्व सणांचा आनंद द्विगुणित झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानांतर आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा करून राज्यातील अनेक भागांना भेट दिली. अनेक विकास कामांचा शुभारंभ केला त्याच प्रमाणे या नवीन सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतले. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे. शिंदे – फडणवीस(shinde fadnavis) सरकारने दहीहंडी सोबतच सर्व सण आणि उत्सव निर्बंध मुक्त केले आहेत. त्यामुळेच या वर्षी दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात लाखोंची बाक्षीसे सुद्धा असणारा आहेत. ठाणे(thane) शहरातील मंडळांमध्येही मोठ्या प्रमाणात चुरस रंगणार आहे .

हे ही वाचा – पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी समिती गठीत

- Advertisement -

दहीहंडी उत्सवाचा आनंद मुंबईसह सगळीकडेच दिसतो आहे. त्याच अनुषंगाने, संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून ठाण्यात दहीहंडीच्या भव्य उत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लाखोंची बक्षिसं सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांमधला उत्साह आणखी वाढला आहे. गोविंदा पथकांमधली उत्सवाची चुरस सुद्धा शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक(pratap sarnaik) फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्यातर्फे ठाण्यात या यावर्षी भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठीचे सर्व नियम पाळून हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला २१ लाख रुपयांचे बक्षिस सुद्धा जाहीर केले आहे. दहीहंडी उत्सवात येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला थराप्रमाणे बक्षिस देण्यात येईल.

हे ही वाचा – ४ ऑगस्ट रोजी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद; १५ टक्के पाणी कपात

राज्यसरकारने(state govt) दहीहंडीच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार म्हणून तरुणाई मध्येही आनंदच वातावरण आहे. त्याचबरोबर गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी नागरिकही उत्सवात सहभागी होऊ शकतील. दरम्यान गणेशोत्सवाचीही जय्यत तयारी राज्यात सुरु झाली. दोन वर्षांनंतर गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार म्हणून सर्वत्र आनंदी वातावरण आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळं सुद्धा तयारीला लागली आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -