ठाण्याच्या प्रसिद्ध ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं निधन

ठाण्यात मामलेदार मिसळीला नावलौकिक मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा

महाराष्ट्राचे मिसळसम्राट अशी ख्याती असलेले, ठाण्याच्या मामलेदार मिसळीचे मालक लक्ष्मण मामा मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे. ठाण्यात मामलेदार मिसळीला नावलौकिक मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

दरम्यान, ठाण्याच्या तहसील कार्यालयाबाहेरील ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड झाला आहे. मात्र या ब्रँडची मुहूर्तमेढ ठाण्यात १९४६ साली रोवली गेली. या मिसळीने यावर्षी सत्तरी गाठली असली तरी मिसळीची असलेली लोकप्रियता, प्रसिद्धी आजही कायम आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशाच्या कुठल्याही भागातून कुणीही ठाण्यात आला, की ‘मामलेदार मिसळ’ खाल्ल्याशिवाय तो परत जात नाही, असे म्हणतात. ठाण्याच्या तहसील कार्यालयाबाहेरील ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड झाला आहे. मात्र या ब्रँडची मुहूर्तमेढ ठाण्यात १९४६ साली रोवली गेली.

लक्ष्मण मुर्डेश्वर त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतूने आजचे तहशीलदार कार्यालय़ म्हणजेच मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली. आणि त्याठिकाणी कँटिन सुरू केले. मात्र १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते हा व्यवसाय सांभाळत आले असून आज या मिसळीच्या व्यवसायाला ७०हून अधिक काळ झाला आहे.


उर्मिला मातोंडकर अडकली ‘शिवबंधनात’