कल्याणमध्ये घरगुती गॅस सिलिंडर लीक झाल्याने स्फोट; दोन महिला गंभीर जखमी

ही दुदैवी घटना संध्याकाळी ६.१५ मिनिटांच्या सुमारास घडली.

कल्याण पश्चिम येथे असलेल्या आर टी ओ जवळ टावरी पाड्यालगत घरगुती गँस् लिक झाल्यामुळे एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात स्फोट झाला. आगीचे लोट उठले या आगीत दोन महिला गंभीर भाजल्याची दुर्दैवी घटना मगंळवारी संध्याकाळी घडली.

कल्याण पश्चिम येथील टावरीपाड्या लगत असलेल्या सर्वोदय हाईट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घरातील मधील किचनमध्ये गँस् लिक झाल्यामुळे लागलेल्या आगीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुदैवी घटना संध्याकाळी ६.१५ मिनिटांच्या सुमारास घडली.

हे ही वाचा – नव्या कळवा पुलावरील चौथी मार्गिका बुधवारपासून वाहतुकीसाठी खुली; महापालिका आयुक्तांची माहिती

सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नावे असून दोघी सासू सूना आहेत .याच दरम्यान घरात बेडरूम मध्ये महिला व तिचे दीड महिन्याचे बाळ होते मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलून सिलेंडर लिकेज थांबवित लिकेजवर नियंत्रण आणले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहचत आगीवर नियंत्रण आणले. आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत किचन मधील साहित्य जळून खाक झाले. तर जखमी महिलांना तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात नेले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

हे ही वाचा – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय