कल्याण तालुक्यातील वरप गावातील टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
जांभूळ आणि त्याच्या आजूबाजूला जंगल असल्याने या बिबट्याचे या जंगल परिसरात वास्तव असून बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्षाच्या शोधात वरप गावाजवळील टाटा पावर हाऊस परिसरात आढळून आला आहे. टाटा पॉवरने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात हा बिबट्या दिसून येत असल्याने वरप गावातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
कल्याण वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी यांनी याबाबत वरप परिसरात रात्रीतच सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र तोपर्यंत मनुष्य वसाहतीतील वाजत असणार्या फटाक्याच्या आवाजाने तो पुन्हा जांभूळ जंगलात निघून गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी लहान मुलांना सायंकाळच्या दरम्यान घराबाहेर पाठवू नये. स्वतःची काळजी आणि सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी कल्याण वन विभागाकडून करण्यात आले आहे.