घरठाणेठाणे शहरात फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी

ठाणे शहरात फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी

Subscribe

गेल्या वर्षी पेक्षा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत 5 टक्के घट, ध्वनी पातळीत 21 टक्के घट नोंदवली

ठाणे शहरात, नागरिकांनी दिवाळी सण उत्स्फुर्तपणे साजरा केला. त्याचवेळी, फटाके वाजण्याच्या प्रमाणात घट झालेली निदर्शनास आली आहे. सन 2022 च्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता, सन 2023 मध्ये हवेतील प्रदूषणाच्या पातळीत 5 टक्के आणि ध्वनी पातळीत 21 टक्क्यांनी घट झाली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यात, ठाणे शहरातील दिवाळी-2023 कालावधीत 8 नोव्हेंबर रोजी दिपावली पूर्व कालावधीत हवेतील धुलिकणांचे प्रमाण. कमी झाल्याचे नोंदवले गेले, असे निरीक्षण मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवशीही फटाक्यांचे प्रमाण कमी ठेवावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. उच्च न्यायालयाने हवेची गुणवत्ता खालावल्याने, फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत दोन तासांची मुदत दिली आहे.

हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन (8657887101) सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत ध्वनी प्रदूषणाच्या दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यांची पडताळणी करून त्यावर आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -