Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात लसीचा तुटवडा , पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध

ठाण्यात लसीचा तुटवडा , पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध

हे सर्व लसीचे डोस कोविशिल्ड आहेत तर कोवॅक्सीनचा साठा खूप कमी आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनावर निदान करण्यासाठी लसीकरण केले जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात आता ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली असून, ठाण्यात लसीचा तुटवडा होत आहे. ठाण्यात लसीची साठा फक्त ६% इतका आहे. लसीची कमतरता होत असून , हा साठा फक्त ४ ते ५ दिवस पुरेल इतका आहे. कल्याण डोबिंवली महानगरपालिकेकडे फक्त ७,६५८ इतकाच लसीचा साठा होता. त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत ३६,००० डोसची उपलब्धता झाली. त्यामुळे केडीएमसीला लसीच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका बसला. ठाणे महानगरपालिकेकडे फक्त ३०.००० डोस आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडे ४०,००० डोस उपलब्ध आहेत. ठाण्यातील ७.९ लाख नागरिकांनी तर कल्याणमधील ७.८२ लाख नागरिकांनी लसीकरणाची नोंदणी को-विन अॅपद्वारे केली आहे. या नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या पाहता ठाणे महानगरपालिकेला ६.५ लाख लसीच्या डोसची गरज आहे. याशिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ७ लाख लसीच्या डोसची आवश्यकता आहे. तर ठाणे महानगरपालिकेकडे ४.६ इतका लसीकरणाचा साठा उपलब्ध होता आणि केडीएमसीला ५.५३ डोसची गरज आहे. हे सर्व लसीचे डोस कोविशिल्ड आहेत तर कोवॅक्सीनचा साठा खूप कमी आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, शहरात मंगळवारी लसीचा साठाच उपलब्ध नव्हता त्यामुळे लसीचा अतिरिक्त साठा घेण्यासाठी क्रेंद्राकडे एसओएस पाठवावे लागले. रविवारी दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असून तो दोन दिवसात संपणार होता. त्यामुळे त्यांनी सरकारला एसओएस पाठवला असता त्यांना एका दिवसापुरता साठा बुधवारी उपलब्ध झाला. गुरुवारी आम्ही दुपारपर्यंत फक्त एका दिवसाच्या 4000 डोसच्या स्टॉकसह प्रारंभ केला, त्यानंतर आम्हाला नवीन स्टॉक मिळाला, असे अभिजीत बांगर यांनी सांगितले.

- Advertisement -

केडीएमसीतील लसीकरणाची सुरवात ७००० लसीच्या डोसने झाली. केडीएमसीचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी असा दावा केला आहे की, लसींची कमतरता असल्याने नागरी संस्था लसीकरणासाठी नवीन केंद्रे उघडू शकली नाही. टीएमसीकडेही पाच दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा आहे. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने नवे निर्बंध लागू केले आहेत.


हेही वाचा – राज्यातील आठ जिल्ह्यांत कडक निर्बंध लागणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

- Advertisement -