दुसरा घरोबा! आई-चिमुकल्यांचा रहस्यमय गळफास

एकाच झाडावर ४ मृतदेह आढळल्याने हत्या की, आत्महत्या या तपासावर पोलीस तर्क-वितर्क लावत आहेत

प्रातिनिधीक फोटो

गुरुवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील उंबरखांड पच्छापूर जंगलात एकाच झाडाला रहस्यमय गळफास घेतलेल्या आईसह तीन छोट्या मुलांचे मृतदेह झाडावर गळफास लागलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे रूग्णालयात नेणार आहेत. त्यातच कुटूंबातील चौघांच्या विदारक मृत्यूच्या धक्क्यामुळे दुसरा घरोबा नव्याने थाटणाऱ्या या दुर्दैवी आई-चिमुकल्यांच्या कुटुंबप्रमुख श्रीपत बांगरे याने नव्या पत्नीसह विषप्राशन केल्याने दोघांनाही मुंबईत रुग्णालयात दाखल केले आहे.

गवंडी काम करणारा उंबरखांडचा श्रीपत बांगारे याने नव्याने घरोबा शहापूर तालुक्यातील पाथरवाडीमधील सविता गांगड हिच्याशी संसार थाटला होता. शहापूर गंगा देवस्थान मंदिरात श्रीपत आणि सविताचा घाईघाईत विवाह उरकला होता. दरम्यान, २० ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता शेतावर गेलेल्या व त्यानंतर घरी न परतलेल्या श्रीपत बंगारे याने पत्नी रंजना, मुलगी दर्शना, रोहिणा आणि मुलगा रोहित हरवल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात नोंद केली होती.

तब्बल २ महिन्यांपासून हरवलेल्या चौघांचा मृतदेह काल जंगलात आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, नायलॉनच्या दोरीने हा गळफास लावल्याचे दिसत असून त्याच्या शरीराते अवशेष झाडाखाली कुजलेल्या स्थितीत पडघा पोलिसांना दिसले. फॉरेन्सीक पथकाने हे मृतदेह अधिक तपासणीकरिता जे.जे रूग्णालयात दाखल केले जाणार आहे. तर श्रीपत बंगारे व त्याच्या नव्या पत्नीचीही विषप्राशनाने प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एकाच झाडावर ४ मृतदेह आढळल्याने हत्या की, आत्महत्या या तपासावर पोलीस तर्क-वितर्क लावत आहेत. तर पडघा पोलीस निरिक्षक कटके तपास करीत आहेत. श्रीपत बंगारेच्या नव्या घरोबामुळे ही दुर्दैवी घटना घडली की, अन्य कारणामुळे हा घातपात घडविला गेला. याचीच चर्चा सर्वत्र होत आहेत.


चर्चेशिवाय घाईत कृषी कायदे मंजूर केले; शरद पवारांचा केंद्रावर निशाणा