घरठाणेठाण्यात नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार; आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठाण्यात नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार; आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे. 

ठाणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफी द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचेकडे केली आहे. याची तातडीने दखल घेऊन आयुक्तांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेत सर्व नवरात्रौत्सव मंडळाचे भाडे माफ केले आहे.

हेही वाचा – एसटीच्या ताफ्यात लवकरच १५० सीएनजी बसेस; प्रदूषण रोखण्यास लागले हातभार

- Advertisement -

मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्यामुळे बहुतांशी सार्वजनिक मंडळे आर्थिक विवंचनेत आहेत. सर्व सार्वजनिक मंडळे सामाजिक उपक्रम राबवित असतात, या मंडळांचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळे गेली अनेकवर्षे काम करीत आहेत, या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण भाडे  माफ केले होते, यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळाला आहे, याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडे माफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केल्यावर त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांचे भाडे माफ करावे असे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.

हेही वाचा – ठाण्यात इमारतीमध्ये लागलेल्या आगीत १० मीटर बॉक्स जळून खाक

- Advertisement -

या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे.

राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांतर्फे रवींद्र नाट्य मंदिरात गुरुवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना प्रश्न विचारला की, गणेशोत्सवात मंडळांकडून परवानगीसाठी किती पैसे मिळतात? त्यावर चहल म्हणाले ‘अगदी थोडे.’ यावर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ ते पैसे सोडून द्या, असे निर्देश दिले. त्यानंतर गणेश मंडळांना मंडपासाठीचे शुल्क यंदा माफ करण्यात आले. अशाचप्रकार निर्णय पुन्हा नवरात्रौत्सवात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -