Eco friendly bappa Competition
घर thane यंदाही मंडप भाडे माफ, ठामपा क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गुड न्यूज

यंदाही मंडप भाडे माफ, ठामपा क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गुड न्यूज

Subscribe

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गोड बातमी आहे. यंदा महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप भाडे माफ करावे अशी मागणी शिंदे गटाच्या शिवसेनेने आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला असून आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून महापालिका क्षेत्रात विविध सार्वजनिक मंडळे कार्यरत असून या मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबरोबरच अनेक लोकोपयोगी असे उपक्रम सातत्याने राबविले जातात, त्यामुळे त्या त्या विभागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. महापालिकेच्या विविध उपक्रमात देखील ते सक्रीय सहभागी होतात. परंतु मागील दोन वर्षात विविध कारणांमुळे या मंडळाची आर्थ‍िक स्थिती नाजूक झाली असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी मंडप भाडे माफ करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. याबाबत आयुक्त बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेवून गणेश मंडळाचे भाडे माफ केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -