घरठाणेगावदेवी मैदानात १४ मे पर्यंत आंबा महोत्सवाचा दरवळ

गावदेवी मैदानात १४ मे पर्यंत आंबा महोत्सवाचा दरवळ

Subscribe

ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आमदार संजय केळकर करीत आहेत. अशी स्तुती करून ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अशा प्रकारचे महोत्सव मुंबईतही व्हावे अशी इच्छा प्रकट केली. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने आजपासून येत्या १४ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी सोहोनी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी, महोत्सवाचे मुख्य आयोजक व आमदार केळकर, कमल केळकर, माजी उपमहापौर सुभाष काळे,अशोक भोईर,मा.नगरसेवक सुनेश जोशी, भरत चव्हाण,ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, समतोलचे विजय जाधव,भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष डॉॅ. राजेश मढवी, उपाध्यक्ष राजेश गाडे, उपाध्यक्ष महेश कदम,शहर सचिव सचिन पाटील, विशाल वाघ, निलेश कोळी, उद्योजक किशोर मसुरकर, व्यापारी सेलचे मितेश शहा आदी उपस्थित होते. समारंभाचे सुत्रसंचालन पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले.
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा चाखता यावा.यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

- Advertisement -

यंदा या महोत्सवाचे १६ वे वर्ष आहे.हा केवळ महोत्सव नसुन एक प्रकारची चळवळ आहे.तेव्हा,खवय्यांनी अस्सल आंब्याची चव चाखण्यासाठी आबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले. मंगळवारी २ मे रोजी या महोत्सवाचे उद्घाटन चिमुकल्या पंचकन्याच्या हस्ते आंबा पूजन करून करण्यात आले. अर्चना परब यांनी मालवणी भाषेत गा-हाणे घालुन आंबा महोत्सवाला आगळ्या शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना कुमार सोहोनी यांनी, हा आंबा महोत्सव बालवयातुन यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम आ. केळकर करीत आहेत. तेव्हा असे आंबा महोत्सव ठाण्याची सीमा ओलांडुन मुंबईतही व्हावेत, जेणेकरून अशा महोत्सवातुन शहरवासीयांना अस्सल आंबे मिळतील आणि कोकणवासियही सक्षम होतील, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -