घरठाणेशहापूर तहसील कार्यालयामध्ये मराठा, कुणबी पुरावे शोध मोहीम सुरू

शहापूर तहसील कार्यालयामध्ये मराठा, कुणबी पुरावे शोध मोहीम सुरू

Subscribe

दोन दिवसात ८५ हजार नोंदी तपासल्या

मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने मराठा समाजातील नागरीकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे दस्तऐवज व पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर तहसिलदार कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील जुन्या कागदपत्रांवरील नोंदींची पडताळणी सुरू करण्यात आली असून दोन दिवसात तब्बल ८५ हजार नोंदी तपासण्यात आल्या आहेत. मराठा समाजातील नागरीकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे दस्तऐवज आणि पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी शासनाच्यावतीने न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणेत आलेली आहे.

त्याअनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कुणबी जातीचे दाखले देण्यासंदर्भात व जुन्या अभिलेखातुन नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शहापुर तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील संबंधित नोंदीची तपासणी मोहीम शहापुरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, तहसीलदार कोमल ठाकुर, अप्पर तहसिलदार विकास बिरादार, निवासी नायब तहसिलदार वसंत चौधरी व नायब तहसिलदार (महसूल) देवाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर युध्द पातळीवर काम सुरू आहे. दोन दिवसात सुमारे तब्बल ८५ हजार नोंदी तपासण्यात आल्या असून महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी या कामात व्यस्त असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी व देवाजी चौधरी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -