घरठाणेबदलापूरचा जवान शहीद

बदलापूरचा जवान शहीद

Subscribe

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे यांना लेहमध्ये बचावकार्यादरम्यान वीरमरण आले. शिंदे हे मूळचे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे होते. बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत शहीद सुनील शिंदेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात व्हेहीकल मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. जानेवारी महिन्याअखेरीच लेह परिसरात हिमस्खलन झाल्याची घटना घडली होती. यावेळी बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचावकार्यादरम्यान सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते. पण बर्फाखाली गाडले गेल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता.

 

- Advertisement -

अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शिंदे आणि इतर जवान हे मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शहीद सुनील शिंदे यांचे पार्थिव बदलापूरच्या घरी आणण्यात आलं. त्यांना लष्कराचा गार्ड ऑफ ऑनर सन्मान प्रदान करून भारताचे लष्कर आणि राज्य पोलीस दलाकडून लष्करी इतमामाने रात्री ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. सुनील शिंदे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -