घरठाणेशहापुरात मास्कच्या किंमती दामदुप्पट

शहापुरात मास्कच्या किंमती दामदुप्पट

Subscribe

शासन नियम पायदळी

कोविड 19 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत शहापूर तालुक्यातील दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा घेतली जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्याच किंमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र हे देशात अग्रेसर ठरले आहे. मात्र या निर्णयाला शहापुरातील दुकानदारांकडून हरताळ फासला जात आहे.

शहापूर शहरातील अनेक दुकानदाराकडे १० रुपयाला विकला जाणारा मास्क २० रुपयाला तर ३० रुपयांचा मास्क ४० रुपयाला विकला जात आहे. तथापी या बाबीकडे नेमके कुणाचे नियंत्रण आहे. हे कळत नसल्यामुळे दुकानदारांच्या या मनमानी सौदेबाजीला आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एन- ९५ मास्कची किंमत १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना देण्याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केले होते. दरम्यान, विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मूल्य मर्यादा ही साथरोग कायद्यानुसार ठरवली असली तरी या मर्यादेला डावलले जात आहे.

- Advertisement -

कोविड प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून मास्कचे दर्जानुसार विक्री मुल्य घेतले पाहिजे, तसेच नागरिकांनी कापड दुकानांऐवजी मेडिकल दुकानांमधील मास्क खरेदी करावेत कारण मेडिकल मधील मास्क सर्टीफाईड असतात. तसेच ग्राहकाकडून मास्कचे जादा पैसे घेणाऱ्या दुकानदारांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार
वैभव गारवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -