घरठाणेउद्योगांना चालना देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न हवेत- मुख्यमंत्री

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न हवेत- मुख्यमंत्री

Subscribe

ठाणे । महाराष्ट्रातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ तसेच मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा (मेडिक्लेम पॉलिसी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी.मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक एकचे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या 8 ते 10 च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.
राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा पूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 8 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन याच्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे, एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत 2.5 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळा विषयी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -