घरठाणेमाध्यमं बदलत आहेत, पण वाचक संपणार नाहीत-गणेश मतकरी

माध्यमं बदलत आहेत, पण वाचक संपणार नाहीत-गणेश मतकरी

Subscribe

डिजिटल क्रांतीमुळे अनेक माध्यमे एकाचवेळी उपलब्ध झाली आहेत. पूर्वी फक्त पुस्तकं आणि अल्पप्रमाणात टि. व्ही. इतकेच पर्याय लोकांसमोर होते, साहजिकच वाचनाला महत्त्व होतं. मात्र आज भरपूर पर्याय असल्याने वाचणार्‍यांचे प्रमाण कमी झाले असले तरी वाचक संपणार नाहीत, अन्य माध्यमांचे नावीन्य ओसरले की लोक पुन्हा वाचनाकडेच वळतील ’ असा आशावाद आजचे आघाडीचे कथाकार गणेश मतकरी यांनी व्यक्त केला. प्रदीप वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या ‘ लेखकाशी गप्पा ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मकरंद जोशी यांनी नेमके प्रश्न विचारून मतकरी यांना बोलतं केलं.

महानगर वर्तमानपत्रात सिने समिक्षा करण्यापासून कथा लेखनापर्यंत आपला लेखन प्रवास कसा झाला हे गणेश मतकरी यांनी तपशीलवार सांगितले, ‘खिडक्या अर्ध्या उघड्या ’ ही कथामाला ( किंवा कादंबरी ) लिहायला सुरवात केली तेव्हा आधी ती पुढे कशी जाईल, त्यातील व्यक्तिरेखांचा प्रवास कसा होईल हे आपल्याला माहित नव्हते, पण जसजसा लिहित गेलो तसे चित्र बनत गेले असे त्यांनी सांगितले. भारतीय आणि जागतिक सिनेमाचा अभ्यास असल्याने, वेगवेगळ्या धर्तीचे सिनेमा सतत पहात असल्याने, सिनेतंत्राचा प्रभाव , परिणाम कथा लेखनावर होतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘जाणीवपूर्वक तसं करत नाही पण कथनशैली, कथेची मांडणी करताना कळत नकळत काही वेळा तसं होतं मात्र मी अमूक पद्धतीने कथा लिहायची असं ठरवून कधी लिहित नाही. असे मतकरींनी सांगितले.

- Advertisement -

पांघरूण, भाई- व्यक्ती की वल्ली या चित्रपटांच्या पटकथा लिहिणार्‍या मतकरी यांनी ‘पटकथा लेखन आणि कथा लेखन ’ यातील फरक स्पष्ट करताना सांगितले की कथा लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असतं, त्याच्यावर बजेट, भाषा, पार्श्वभूमी, पात्रांची संख्या, प्रसंगाची संख्या अशी कोणतीही बंधने नसतात. मात्र चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने तिथे पटकथा त्याच्या दृष्टिकोनातून लिहावी लागते, शिवाय दृकश्राव्य माध्यम असल्याने अनेक निर्बंध येतात, असे मतकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -