घरठाणेठाण्यातील आघाडीत बिघाडीचे आमंत्रण ?

ठाण्यातील आघाडीत बिघाडीचे आमंत्रण ?

Subscribe

आमदार केळकर आणि महापौर म्हस्के  यांची भेट

शहरात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीमधील स्थानिक नेतेमंडळींमध्ये चांगलीच जुंपली आहे. अक्षरशः वैयक्तिक टीका करून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच सोमवारी महापालिकेत भाजप आमदार संजय केळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के यांची भेटीने आघाडीत बिघाडीला आमंत्रण दिल्याची चर्चा आहे.   तसेच या भेटीमुळे भाजप-सेनेत पुन्हा युती होते की अशीच चर्चा होऊ लागली आहे.

शनिवारी कळवा -खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची एकप्रकारे मालिकाच रंगली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के विरुध्द राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात शाब्दीक वादविवादामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर म्हस्के यांनी वैयक्तिक मत मांडताना महाविकास आघाडी नको असे म्हणून वादाला तोंड फोडले आहे. त्याला चोवीस तास होत नाही तोच सोमवारी म्हस्के आणि भाजप आमदार केळकर यांची झालेली भेट ही या आघाडीत बिघाडी साठी कारणीभूत ठरावी म्हणून झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.  महापौर दालनात झालेल्या भेटी दरम्यान म्हस्के यांनी केळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संदीप लेले, मिलिंद पाटणकर आदी भाजप नगरसेवक उपस्थित होते.

- Advertisement -

ही केवळ सदिच्छा भेट
महापालिकेत भाजप नगरसेवकांबरोबर चर्चेसाठी आलो होतो, त्याचवेळेस महापौर म्हस्के हे भाजप गटनेत्याच्या दालनात आले आणि त्यांनी मला आपल्या दालनात येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, ती केवळ  सदिच्छाच भेट होती. ”
-संजय केळकर -आमदार, भाजप, ठाणे शहर

आमचे मैत्रीचे नाते
” आमदार केळकर आणि माझे मैत्रीचे नाते आहे. ते महापालिकेत दिसले म्हणून त्यांना चहापानासाठी बोलावले होते. तसेच ते वरीष्ठ आणि शहराचे आमदार आहेत, त्यात कोणत्याही स्वरुपाचे राजकारण नाही.”

- Advertisement -

– नरेश म्हस्के – महापौर, ठामपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -