घरठाणेस्थानिक सेना, मनसे, भाजपा नेत्यांचे मिले सूर मेरा तुम्हारा

स्थानिक सेना, मनसे, भाजपा नेत्यांचे मिले सूर मेरा तुम्हारा

Subscribe

बुधवारी डोंबिवलीत नववर्षाची शोभा यात्रा जल्लोषात निघाली. मात्र या शोभा यात्रेच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या अनेक कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राबरोबर भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण व शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांचे फोटो एकत्र पाहायला मिळाले. तर दुसरीकडे शिवसेना आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर कायम टीका करणार्‍या मनसेचे आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मनसेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घेवून गेल्याचे पाहायला मिळाले. भविष्यात सेना, मनसे व भाजपा युती होईल कि नाही हे आत्ताच सांगणे अवघड असले तरी यंदाच्या पाडव्याच्या निमित्ताने स्थानिक शिवसेना, मनसे व भाजपा नेत्यांनी मिले सूर मेरा तुम्हारा असे सूर आतापासून आळवण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे .

राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचे शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर येवून आठ महिने झाले. मात्र स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिवसेनेचे मनोमिलन झाल्याचे फारसे दिसले नाही. आजही डोंबिवलीत शिवसेना विरुद्ध भाजपा असे शह काटशहाचे राजकारण सुरु असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे व भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भाजपा व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे संबंध चांगले असल्याचे दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मनसे आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्धच सुरू असल्याचे अनेकदा दिसून आले. मनसेचे आमदार राजू पाटील हे संधी मिळेल तेव्हा शिवसेना आणि खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांना टीकेचे लक्ष्य करीत असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील सेना, मनसे व भाजपा नेत्यांचे मनोमिलन कधी होणार? आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे एकत्र कधी येणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र बुधवारी गुढीपाडवा शोभा यात्रेच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या अनेक कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राबरोबर भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण व शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांचे फोटो एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांची आश्चर्याने तोंडात बोटे गेली.

- Advertisement -

दुसरीकडे शिवसेना आणि खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका टिपण्णी करण्याची एकही संधी मनसेचे आमदार राजू पाटील हे सोडत नाहीत. ट्वीट करून हळूच चिमटा घेणे किंवा टोले लगावणे यात राजू पाटील कल्याण डोंबिवलीत तरी आघाडीवर असतात. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेसाठी आले होते. गणेश मंदिराशेजारीच मनसेचे डोंबिवलीतील मध्यवर्ती कार्यालय आहे. आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेवून मनसेच्या शाखेत गेले. त्यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे सुद्धा सोबत होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भविष्यात सेना, मनसे व भाजपा युती होईल कि नाही हे आता सांगणे शक्य नसले तरी यंदाचा पाडव्याच्या निमित्ताने स्थानिक सेना, मनसे व भाजपाच्या नेत्यांनी मिले सूर मेरा तुम्हारा असे सूर आता पासून आळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -