घरठाणेभिवंडीतील 'एमआयएम' च्या नेत्याला खंडणी प्रकरणी अटक

भिवंडीतील ‘एमआयएम’ च्या नेत्याला खंडणी प्रकरणी अटक

Subscribe

खंडणी प्रकरणी एमआयएमच्या नेत्यासह चौघांना भिवंडीतून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याने एका बांधकाम व्यवसायिकाकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या नेत्यासह चौघांना एका खोलीतून अटक केली. मोहम्मद खालिद मुख्तार अहमद शेख उर्फ गुड्डू (४७) असे अटक करण्यात आलेल्या एमआयएम या राजकीय पक्षाचा भिवंडीतील नेत्याचे नाव आहे. खालिद उर्फ गुड्डू याच्यासोबत त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया, फैज आलम, गुलाम खान या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे.

खालिद उर्फ गुड्डू हा भिवंडीतील कणेरी येथील समदनगर बद्दनिस्सा बंगला येथे राहण्यास आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांकडून पोलिसांनी १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. अटक करण्यात आलेला खालिद गुड्डू याच्यावर पुणे, गुजरात, अलिबागसह भिवंडीत २३ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

- Advertisement -

भिवंडीतील एका बांधकाम व्यवसायिकाकडे खालिद याने एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती, याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी खालिद याच्याविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. दरम्यान गुन्हे शाखेने भिवंडी शहर पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री खालिद उर्फ गुड्डू याच्या घरावर छापा टाकून खालिद उर्फ गुड्डू आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून १ लाख २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी या चौघांना खंडणी, हत्यारबंदी कायदा तसेच अपहरण प्रकरणी गुन्ह्यात अटक केली. खालिद उर्फ गुड्डू हा पूर्वी एका राजीकिय पक्षात होता, त्यानंतर त्याने एमआयआय पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु काही हजार मतांनी त्याचा पराभव झाला होता, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -