खंडणीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या, दोन मित्रांना अटक

murdered

ठाण्यातील मिरारोड येथे एका 13 वर्षीय मुलाची मित्रांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. 25 लाखांच्या खंडणीसाठी हे कृत्या केल्याचे समोर आले आहे. 13 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची चाकूने भोकसून हत्या झाली. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.

काय घडले –

मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग राहतात. त्यांना अजय (वय 15) आणि मयांक सिंग (वय13) अशी दोन मुले आहेत. बोरिवलीत एका बारमध्ये गायिका म्हणून त्या काम करतात. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. तेव्हा रात्री 12 च्या सुमारास मुलगा मयांक घरातून बेपत्ता झाल होता.मयांक बेपत्ता झाल्यानंतर काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी मयांकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला.

आरोपींना अटक –

मयांकची चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. काशिमिरा पोलिसांनी या प्रकरणी अफझल अन्सारी (वय 22) आणि इम्रान शेख (वय 24) या दोन आरोपींना अटक केली आहे.

मयांकला संशय आल्याने केली हत्या –

अटक करण्यात आलेले आरोपी मृत मुलाचे मित्र होते. मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे त्यांना वाटत होते. पैशांच्या अमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण केले. त्यानंतर खंडणीचा बनाव रचला होता. मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याच्याच फोनवरून खंडणी मागीतली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.