Eco friendly bappa Competition
घर ठाणे अंबरनाथच्या सर्वोदय नगरात नवीन जलकुंभ उभारणार- आमदार बालाजी किणीकर

अंबरनाथच्या सर्वोदय नगरात नवीन जलकुंभ उभारणार- आमदार बालाजी किणीकर

Subscribe

अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदय नगर, चिखलोली परिसरातील नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वोदय नगरात दोन दक्ष लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी दिली. शुक्रवारी या जलकुंभाच्या नियोजित जागेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषदेच्या अभियंत्यासह पाहणी करण्यात आली. अंबरनाथ पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या असून या पाणी प्रश्नाबाबत गंभीर दखल घेत आमदार डॉ किणीकर यांनी बेलवली येथे मुख्य संतुलन टाकी ते सर्वोदय नगर जलकुंभापर्यंत गुरुत्व वाहिनी टाकणे, सर्वोदय नगर येथे पंप हाऊस बांधणे तसेच 2 द.ल.ली. क्षमतेचा जलकुंभ बांधण्यासाठी जागे ची पाहणी केली. या भागातील पाणी समस्या मार्गी लागणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

संयुक्त अग्निशमन केंद्र उभारणार
चिखलोली येथे शिवमंदिर तलावासमोर अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने संयुक्त रित्या अग्निशमन केंद्र देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती किणीकर यांनी दिली. आमदार किणीकर यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी एमजीपीचे अभियंता मिलिंद बसनगार, नगरपरिषदेचे अभियंता सुनील कुमार जाधव, तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -