Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे विर्सजन घाट न झाल्यास आंदोलनाचा इशारा- आमदार सरनाईक

विर्सजन घाट न झाल्यास आंदोलनाचा इशारा- आमदार सरनाईक

Subscribe

घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 वर विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाटाचे काम गणेश उत्सवापूर्वीच पूर्ण करा अशा सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका अधिकार्‍यांनी केल्या आहेत. मंगळवारी आमदार आणि महापालिका अधिकार्‍यांनी त्या चौपाटीचा पाहणी दौरा केला. यावेळी आमदारांनी सूचना केल्या आहेत. तसेच उर्वरीत लँडस्केपींग गार्डन, पाथवे, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत सांगितले आहे. याचदरम्यान जर गणेश उत्सवापुर्वी विर्सजन घाट व दशक्रिया विधी घाट पूर्ण झाला नाही तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही मला लोकांच्या हितासाठी आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

मंगळवारच्या पाहणी दौर्‍यात कासारवडवली, भाइर्दरपाडा, ओवळा येथील सर्व नागरिकांनी भेटून विर्सजन घाट व दशक्रिया विधी घाट लवकरात लवकर पुर्ण करून देण्याची मागणी आमदार सरनाईक यांच्या केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांच्या आदी अधिकार्‍यांसह माजी नगरसेविका साधना जोशी, विद्युत विभागाचे रोकडे, वाहतुक पोलिस निरिक्षक संदीप सावंत तसेच मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मेरी टाईम बोर्ड व ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदार सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू असलेल्या गायमुख येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा टप्पा क्रं. 1 नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून चौपाटीचा टप्पा क्रं. 2 वर विर्सजन घाट व दशक्रिया विधी घाटाचे काम अपूर्ण असल्याने लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच आमदार सरनाईक यांच्या आमदार निधीतून घोडबंदर रोडवर अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कुठे बसवावी त्याची देखील पाहणी वाहतुक शाखेच्या अधिकार्‍यांसमवेत केली.तर चौपाटीचे काम पुर्ण झाल्यानंतर अनेक पर्यटक, नागरिक तेथे येणार असल्याने भविष्यात गाड्या पार्किंगचा प्रश्न उद्भवू शकतो, यासाठी चौपाटीवर किमान 200 गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात यावी तसेच या प्रकल्पासाठी ज्या नागरिकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांचे देखील पुर्नवसन लवकरात लवकर करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मोहन कलाल यांनी दिले.

- Advertisement -

भाइर्दर पाडा येथील 800 मीटर लांबीची असलेली चौपाटी पुढे जावून 2.4 कि.मी.पर्यंत होणार असून त्याचा फायदा घोडबंदर रोडवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या चौपाटीचे काम पुर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील खाडी किनार्‍यावर 6 कि.मी. लांबीची सर्वात मोठी चौपाटी होणार आहे. तेथे कान्होजी आंग्रे यांच्या आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील ही चौपाटी एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -