मुंब्र्यात भोंगे काढले नाही तर पहाटेपासून हनुमान चालिसा, अविनाश जाधव यांचा इशारा

मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावाच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसाही पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत.

मुंब्र्यातील मशिदीवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाहीत आणि बांग सुरू झाली तर सकाळी 5 वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन आम्ही ठाणे जिल्ह्यात करणार असे जाधव यांनी सांगितले. जाधव यांच्या या इशाऱ्यामुळे ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावाच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.अनेक वर्षांपासून हा विषय सुटता नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार असून यासाठी मनसे सैनिक सज्ज असल्याचे जाधव यांनी सांगितले.