घरठाणेबाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न, मनसेकडून केडीएमसी आयुक्तांना पत्र

बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न, मनसेकडून केडीएमसी आयुक्तांना पत्र

Subscribe

डोंबिवली –  गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असून कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांतून विघ्नहर्ता गणरायांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र वाहनातून, ट्रोलीतून वा हातगाडीवरून गणरायांच्या मूर्तींची ने – आण करणे खड्ड्यांमुळे धोक्याचे झाले आहे. तरीही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्था धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे हा विषय अत्यंत संवेदनशील झाला असून त्याची गांभीर्याने दखल घेवून तातडीने रस्ते सुस्थितीत करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. (MNS leader wrote letter to kdmc Commissioner about pothole)

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रुग्णांना मिळणार ‘लेझर’ शस्त्रक्रिया’ उपचार; महिन्याभरात 12 शस्त्रक्रिया यशस्वी

- Advertisement -

यंदा पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरूस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये अनेक पटीने वाढ झाल्याने खड्ड्यांमुळे रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वच रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरणे व पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करणे या कामांचे टेंडरच वेळेवर काढले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे . पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली गेली नसल्याने यंदा रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे या खड्ड्यांना पाऊस जबाबदार नसून पालिका प्रशासन, शहर अभियंता व बांधकाम विभागच जबाबदार आहे. मात्र संबंधितांवर अद्यापपर्यंत कोणतीही जबाबदारी निश्चित करून कोणतीही कारवाई केली नसल्याकडे प्रल्हाद म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – बदलापुरात निष्ठावंतांचं भगवं वादळ, शिवसेनेच्या मेळाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील सर्वच नागरिक व वाहन चालक त्रस्त झालेले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन आतापर्यंत अनेक जखमी झाले तर काहींचा जीव गेला आहे. तरीही पालिका प्रशासन गंभीर असल्याचे दिसून येत नाही. आता गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. याच खड्ड्यातून विघ्नहर्ता गणरायांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र वाहनातून, ट्रॉलीतून वा हातगाडीवरून गणरायांच्या मूर्तींची ने – आण करणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धोक्याचे झाले आहे. अजूनही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनुचित घटना घडून शहरातील कायदा व सुव्यस्था धोक्यात येण्याची भीती प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे हा अत्यंत संवेदनशील असा विषय झाला असून त्याची गांभीर्याने दखल घेवून तातडीने खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -