Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे वासिंद पोलीस ठाण्यातील निम्म्याहून अधिक पोलीस होम क्वारंटाईन

वासिंद पोलीस ठाण्यातील निम्म्याहून अधिक पोलीस होम क्वारंटाईन

वासिंद पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरिक्षकांची केली नेमणूक

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद शहर व परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाटयाने फैलाव होतआहे. वासिंद पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ पोलीस निरिक्षकासह दोन पोलीस उपनिरिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तातडीने  वासिंद पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तथापि पोलीस ठाण्यातील या तीन कोरोना बाधीत पोलीस अधिकाऱ्यांवर उपचार सुरु आहेत .कोरोना बाधीत झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कांत आलेल्या पोलीस ठाण्यातील ३९ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी निम्याहुन अधिक पोलीस कर्मचारी सध्या होम क्वारंटाईन झालेले आहेत. यामुळे सध्या ऑनड्युटी कर्तव्यावर असलेल्या पोलीस ठाण्यातील १४ अन्य पुरुष,व महिला कर्मचाऱ्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

 

- Advertisement -

वासिंद शहरातील हा वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आरोग्य व्यवस्थापनाला सपशेल अपयश आल्याचे आता स्पष्ट होत आहे.वासिंद मध्ये तर गेल्या आठवड्यात तीन जणांचा उपचारादरम्यान कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे.तालुक्यात चार हजारापेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनानेग्रस्त आहेत.दररोज दिडशे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह होत आहेत.यात ५० हुन अधिक रुग्ण हे वासिंद परिसरात सापडत आहेत.आतापर्यंत तालुक्यात १३५ जणांचा कोरोनाने मृत्यू ओढावल्याची शासकीय नोंद आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे काहुर माजले आहे.स्थानिक आरोग्य प्रशासनाने अगदी घाईघाईने  शहापूर गोठेघर येथे १६० बेडचे कोविड केयर सेंटर उभे केले आहे.परंतु येथे अपुरे डॉक्टर व कर्मचारी आहेत तसेच अत्याधुनिक उपचार सुविधा देखील नाही प्रचंड असुविधा असल्याने येथे रुग्णांवर फक्त तात्पुरते उपचार केले जात आहेत अपुऱ्या उपचार सुविधांमुळे कोविड सेंटरचा बोजवारा उडाला आहे.

 

- Advertisement -

कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर उपचारासाठी पुढे ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविले जात आहे. यामुळे हे गोठेघर येथील कोविड सेंटर उपचारासाठी कुचकामी ठरले आहे. योग्य उपचाराअभावी तर ग्रामीण भागातील काही रुग्णांना शहापूर,कल्याण, ठाणे, येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागत आहे.या वाढत्या कोराना बांधितामुळे शहापूर तालुक्यात आता कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालयाचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वेळीच प्रशासनाने कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर झपाट्याने शहापूरचा संपूर्ण ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो हा असाच आकडा वाढत राहिल्यास शहापूर तालुका हे लवकरच कोरोनाचे हॉट स्पॉट होण्याची भीती आता व्यक्त होत आहे .

- Advertisement -